मुंबई : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं वास्तव्य असलेलं घर असेल, त्यांची साहित्यसंपदा, त्यांच्या आठवणी असतील या सगळ्यांची नोंद पहिल्यांदा आदरणीय शरद पवार साहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते, त्या कार्यकाळात सुरू झाली. अण्णाभाऊ साठे स्मृती स्मारक समिती यांच्या माध्यमातून राखण्यात आली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.

सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की,देशात UPSC चा पेपर कधी फुटत नाही, मग नीटचा पेपर कसा फुटतो?नीट प्रकरणाची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. यासाठी एक एसआयटी स्थापन करा. सर्व पक्षीय बैठक किंवा संयुक्त संसदीय समिती स्थापन करता येते. भारताचे शिक्षण पुढे कसं असावं? UPSC ची परीक्षा होते. त्याचा पेपर कधी फुटतो का? UPSC चा पेपर फुटत नाही,पण नीटचा पेपर फुटतो,असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना म्हटले आहे.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,खरंतर अनेक कोचिंग क्लासेस असे आहेत, त्यांचे आयपीओ येत आहेत. ऐवढा पैसा त्यांच्याकडे झाला आहे. ते मोठा व्यवसायक करून त्यांचा सार्वजनिक कंपन्यांच्या यादीत समावेश होत आहे. हे धक्कादायक आहे.. शिक्षणाचं बाजारीकरण झालं आहे. आता शिक्षण व्यवस्थेवर आम्ही चर्चा करायची नाही, तर कोणी करायची. संसद भवन त्याच्यासाठीच आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून तरुणांना न्याय मिळावा, परीक्षा पारदर्शक व्हावी. जगात परीक्षा होतात, तिथे कसा पेपर फुटत नाही. आपल्याच इथे कसा पेपर फुटतो, असेही सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.

पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,आधार कार्डचा चांगला कार्यक्रम हा काँग्रेस-यूपीए सरकारच्या काळात झाला. त्यामुळे प्रत्येकाला आधार मिळाला. मग ते पारदर्शक होऊ शकते. तर नीटचा पेपर होऊ शकत नाही. आता बिल आणलं, त्यात मी समाधानी नाही. राष्ट्रवादी काँग्रेसही नाही. इंडिया आघाडी देखील नाही. राजकारणी नव्हे, तर पालक म्हणूनही मी समाधानी नाही. या प्रकरणात शिक्षा होऊन फायदा नाही. तुम्ही पेपरफुटी थांबवल्या पाहिजे. एखाद्याने तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करून पेपर फोडला, तर त्याच्यावर प्रशासन कोणाचं असेल. हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घ्यावे. पहलगामवेळी देशहितासाठी एक झाले. विरोधी पक्षाला विश्वासात घ्यावे. अश्रूधूरांच्या नळकांड्या फोडल्या. त्याचा आवाज आम्हाला संसदेत ऐकू येत होते. कुटुंबाचा विचार करा. जंतरमंतरवर लाईव्ह करत होते. मुलांशी प्रेमाने कोणी बोललं असतं, तर प्रश्न सुटला नसता का? असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.