प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे –

भाजप ही राहुल गांधींना इतकी घाबरली आहे, जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी त्यांना राहुल गांधीच दिसतात. आणि मग व्यक्तिगत टीका करून मूळ मुद्द्यापासून दूर कसं न्यायचं, याचा प्रयत्न छोटे-छोटे बालकांना पाठवून ते करत असतात.
आधी आदिवासी विभागाचा 29 टक्के निधी का खर्च झाले नाही, त्याचं उत्तर दिलं का? तुम्ही आदिवासी विभागाचे पैसे दुसऱ्या विभागाकडे डायव्हर्ट करता, त्याचं उत्तर दिलं का? मुलांच्या ज्या मागण्या आहेत, त्या मागण्या आजच्या आहेत का? १६ दिवसापासून ते उपोषण करत आहेत, त्यांचा मोर्चा, त्यांचा प्रोटेस्ट सुरू आहे.
मग त्यांना सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, पुस्तकं जे आहेत ते त्यांना लायब्ररीतून पाहिजे, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? हा राहुल गांधींच्याच कडे छात्रोकी गुंजमध्ये त्या मुली गेल्या, त्यांनी व्यथा मांडल्या आणि राहुल गांधींनी पत्र लिहिलं, मग मला तुम्हाला ॲक्शन घ्यावी लागली.
आता कुठं आपलं तोंड लपवायचं, अशी तुमची परिस्थिती जी आहे, ती स्पष्टपणे दिसत आहे. आणि या मागण्या ज्या आहेत, या मागण्या खरंच योग्य नाही का? मग तुम्ही या मागण्यांकडे लक्ष द्यायचं, त्या कशा सोडवायच्या याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी अशोक उईके साहेब प्रेझ कॉन्फरन्स मधून उठून पळून जातात.
म्हणजे तुम्ही दडपशाही, लोकांना घाबरवणे हे सगळं करूनही होत नाही, तर मग उत्तर देणे नाही आणि मूळ प्रश्नाकडे लक्ष देणे नाही, हा तुमचा जो कारभार आहे ना, त्याच्यामुळेच मुलं रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे तुम्ही अजून जास्त त्रास दिला, असंच डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला, विद्यार्थ्यांच्या आंदोलन पुढे किती तीव्र होईल तुम्हाला याची कल्पना सरकारने केलेली असेलच.