कामथे : रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर महिला आघाडीच्या वतीने कामथे येथील बाळासाहेब माटे कुटीर रुग्णालयात शहराध्यक्षl रुखसार रईस अलवी यांच्या अध्यक्षते खाली आणि महिला जिल्हाध्यक्षा दीपिका कोतवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्यसेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असलेली राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.

आरोग्यसेवक हे समाजाच्या आरोग्याचे रक्षण करणारे महत्त्वाचे घटक आहेत. दिवस-रात्र रुग्णांची सेवा करताना डॉक्टर व आरोग्य कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या या सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला आघाडीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून प्रेम, विश्वास, सुरक्षितता, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी यांचा संदेश देणारा सण आहे. समाजातील विविध घटकांमध्ये स्नेह, बंधुभाव आणि परस्पर आदर वाढावा, तसेच आरोग्यसेवक आणि नागरिक यांच्यातील आत्मीयता अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.

यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या सेवाकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. “समाजाचे आरोग्य जपणाऱ्या आरोग्यसेवकांच्या पाठीशी समाज कायम उभा आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा अरुता आडविलकर, नसीम सय्यद,सीमा ताई चाळके, दीपा कोलथेकर , सुजाता दळवी, राधिका तटकरे, व ईतर पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.