नाशिक : नाशिकमध्ये आजपासून तीन दिवस ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, यावेळी अनेक मंत्री आणि मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. पुढील तीन दिवस विविध मान्यवरांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, नाशिककरांसाठी या कार्यक्रमांचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. सिंहस्थ महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या भक्ती संगमामुळे नाशिकमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळणार आहे.