चिपळूण: येथील रॉयल मेडिकलचे श्री हमीदभाई दलवाई यांची नात आणि श्री. फाजल मुकादम यांची कन्या कु.मनाल झीनत फाजल मुकादम ही कुवेत येथे सीबीएससी बोर्डाच्या दहावी परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
तिच्या जन्मापासूनच आई-वडिलांसह ती कुवेत येथेच राहते. इयत्ता पहिलीपासून तिने शालेय जीवनात यश मिळवायला सुरुवात केली. नियमित अभ्यास करून तिने हे यश संपादन केले आहे. या यशाबद्दल तिच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
