लोटे : (ज्ञानेश्वर रोकडे) रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून लोटे परशुराम औद्योगिक वसाहत ओळखली जाते. या वसाहती मधील अनधिकृत बांधकामे आणि टपऱ्या लवकरच एमआयडीसी कडून हटविण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
तशा लेखी सूचना लोटे परशुराम औद्योगिक वसाहत तसेच अतिरिक्त लोटे परशुराम औद्योगिक वसाहती मधील अनधिकृत बांधकामे आणि टपरी धारकांना देण्यात आल्या आहेत. सात दिवसांच्या आत ही बांधकामे हटवावीत अन्यथा एमआयडीसी कडून ही बांधकामे निष्कासीत करून त्यासाठी येणारा खर्च या अनधिकृत बांधकामधारकांकडून तसेच टपरी चालकांकडून वसूल करण्यात येईल, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.