लांजा : रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाज सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक विशेष सर्वसाधारण सभा ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता लांजा येथील जावडे रोड, गणेश मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत संस्थेच्या पुढील पंचवार्षिक कार्यकारिणीसाठी २३ संचालकांची निवड करणे, नूतन संचालकांमधून नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आदी विषयांवर कामकाज होणार आहे. तरी संस्थेच्या सर्व सभासदांनी निवडणूक प्रक्रियेत भाग घेण्यासाठी वेळीच उपस्थित राहावे, असे सचिव माधव शेट्ये यांनी आवाहन केले आहे.
जिल्हा वैश्यवाणी समाज सेवा संस्थेची ८ एप्रिलला लांजा येथे विशेष सभा
