चिपळूण – नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेने चिपळूण तालुक्यातील विविध क्षेत्रातील ९ कर्तृत्ववान महिलांचा ‘नवदुर्गा’ म्हणून सन्मान केला. ‘नवदुर्गा दर्शन, पूजन आणि सन्मान दौऱ्यात’ घरोघरी जाऊन ओटीभरण, प्रशस्तिपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

सन्मानित नवदुर्गा : भूमिकन्या – शुभांगी राजवीर (शेती), समाजशक्ती – सीमा यादव (सामाजिक, साहित्य), निसर्ग रक्षक – डॉ. विनया जंगले (वन्यजीव संवर्धन), स्वयंसिद्धा – स्वरा सावंत (महिला सक्षमीकरण), दुर्गाशक्ती – समीक्षा कदम (क्रीडा), ज्ञानज्योती – डॉ. रोहिणी ओतारी (शिक्षण), संस्कृती रत्न – स्मिताताई देवधर (८४ वर्षीय साहित्यिका), निर्भया शक्ती – आकांक्षा कलकुटकी (आत्मसंरक्षण) आणि आरोग्यदूत – तंझिम पोटे (नर्सिंग सेवा).

हा उपक्रम तालुकाप्रमुख बळीराम गुजर आणि शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे यांच्या संकल्पनेतून, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे यांच्या नेतृत्वाखाली आणि शहर सचिव प्रशांत मुळ्ये यांच्या नियोजनातून पार पडला. यावेळी महिला उपजिल्हा संघटिका ऐश्वर्या घोसाळकर, महिला शहर संघटिका वैशाली शिंदे, युवतीसेना तालुका अधिकारी तीर्था लाड, पंचायत समिती सदस्या सुप्रिया वंजारे, उपशहरप्रमुख राजू विखारे आणि विभागप्रमुख आबा मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.