चिपळूण : चिपळूण तालुक्यात पावसाने दिलेल्या दीर्घ खंडामुळे शेती आणि पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी तातडीने ई-मेलद्वारे मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद जाधव (पाटील) यांना निवेदन पाठवून चिपळूण तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करण्याची मागणी केली आहे.
या मागणीची तात्काळ दखल घेत मंत्री मकरंद जाधव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्या अहवालानुसार हा विषय गुरुवारी होणाऱ्या दुष्काळ उपसमितीच्या बैठकीसमोर सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
आमदार शेखर निकम यांच्या या पाठपुराव्यामुळे चिपळूणच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून, पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
