रत्नागिरी – जिल्ह्यात नवीन उद्योगांना चालना देण्यासाठी आणि नवीन गुंतवणूकदारांसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ‘जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद रविवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत सावंत पॅलेस हॉटेल, टीआरपी रोड येथे होणार आहे.
या परिषदेचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डाॕ उदय सामंत भूषवणार असून, कार्यक्रमास उद्योग आयुक्त डाॕ कादंबरी बलकवडे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मैत्रीचे विशेष आयुक्त वैभव वाघमारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देणे आणि नवीन गुंतवणूकदारांसोबत सामंजस्य करार (MoU) करणे हा याचा उद्देश आहे.
परिषदेमध्ये विदेश व्यापार महासंचालनालय (DGFT), मैत्री कक्ष, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), कामगार विभाग इत्यादी उद्योगांशी संबंधित प्रमुख विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी आणि गुंतवणूकदारांनी या परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त (उद्योग व सेवा) अजिंक्य आजगेकर यांनी केले आहे.
उद्योगमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या उपस्थितीत रविवारी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद…
