चिपळूण : चिपळूण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उर्दू येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्थानिक नगरसेविका नसरीन खडस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत विद्यार्थ्यांनी देशभक्तीचा जागर केला. स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहाने सादर केले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रभावी कवायतीच्या प्रकारांनी उपस्थितांची विशेष दाद मिळवली. त्यांच्या शिस्तबद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे मान्यवरांनी कौतुक केले.
कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा रेहाना बिजले, माजी उपनगराध्यक्ष करामत मिठागरी, दानशूर इकबाल कोंडविलकर, महाराष्ट्र हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक जमालुद्दीन बंदरकर, माजी केंद्रप्रमुख अब्दुल रऊफ सुर्वे, सेवानिवृत्त शिक्षक मुश्ताक आष्टीकर, इंदाज मीर, जुनेद मौलाना, सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज कडू, इरफान हमदुले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
तसेच मुख्याध्यापक शौकत अली कारविनकर, शिक्षिका राहीन जहीर अहमद नेवरेकर आणि पदवीधर शिक्षक शेख जमील अहमद अब्दुल समी‌ यांचीही उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीते, भाषणे आणि कवायतीच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक जडणघडणीत योगदान देणाऱ्या दानशूर इकबाल कोंडविलकर यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना पेन व दप्तरांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, देशभक्तीची भावना आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला.
शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवरांच्या सहभागामुळे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उर्दूचा स्वातंत्र्यदिन सोहळा संस्मरणीय ठरला.