चिपळूण : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून उमा फॅशन इन्स्टिट्यूटच्या वतीने देशसेवेसाठी सीमेवर कर्तव्य बजाविणारे शूर सैनिक श्री मंदार सुनील महाडिक यांच्या पत्नी सौ.प्रतीक्षा महाडिक यांचा विशेष सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

सैनिक श्री मंदार महाडिक भारतीय सैन्यात कार्यरत असून ऑपरेशन सिंदूरच्या काळात ते कर्तव्यावर होते. त्या काळातील अत्यंत कठीण परिस्थितीचे अनुभव सौ.महाडिक यांनी उपस्थिततांना सांगितले. सीमेवरील तणावपूर्ण वातावरणात सायंकाळी सहा वाजल्यानंतर परिसरात कसा काळोख पसरायचा, सर्वांनी शांत राहून परिस्थितीचा सामना कसा करायचा, अनेकदा जेवणाचीही अडचण कशी निर्माण व्हायची, अशा अनेक अंगावर शहारे आणणारे पतीने सांगितलेले अनुभव त्यांनी सांगितले.

आपला देश सुरक्षित राहावा म्हणून सीमेवर सैनिक अहोरात्र कर्तव्य बजावत असतात; मात्र त्यांच्या मागे उभ्या असलेल्या पत्नी, आई-वडील आणि मुलांचाही त्याग तितकाच मोठा असतो.

या भावनेतूनच स्वातंत्र्यदिनी एका सैनिकपत्नीचा सन्मानकरण्यात आला.
यावेळी उपस्थित खेर्डी प्रभाग संघाच्या अध्यक्ष सौ. समिता भुरण, सौ.गीता फाळके, सौ.प्रज्ञा घाग, सौ.तृप्ती कुंभार, प्रभागसंघ लिपीका, आजरा शेख, इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सर्वांनी भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत “देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या प्रत्येक सैनिकाला आणि त्याच्या कुटुंबाला मनापासून सलाम!” अशी भावना व्यक्त केली. इन्स्टिट्यूटच्या संचालिका सौ. उमा म्हाडदळकर यांनी सर्वांचे आभार मानले.