मुंबई : महाराष्ट्र सायबर सेलने जाहीर केलेल्या माहितीनुसार एक गोष्ट स्पष्ट होते. विद्यार्थ्यांच्या आणि ‘नीट’च्या (NEET) खांद्यावर बंदूक ठेवून काही जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना येथे ‘गजवा-ए-हिंद’ घडवून आणायचा होता.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आणि ‘गजवा-ए-हिंद’चा काहीही संबंध नाही. एकीकडे ‘नीट’ परीक्षांवर प्रश्न उपस्थित केले जात असताना, त्याच आंदोलनात ‘सर तन से जुदा’च्या घोषणा का देण्यात आल्या? आमच्या हिंदू आणि सनातन धर्माविरोधात -घोषणाबाजी का करण्यात आली? देवी-देवतांची आक्षेपार्ह छायाचित्रे का दाखवण्यात आली?
‘सर तन से जुदा’ आणि ‘अल्लाहू अकबर’ या घोषणांचा ‘नीट’ परीक्षेशी काय संबंध आहे? विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सोडवले जातील. मात्र, -त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर कोणी या देशात ‘गजवा-ए-हिंद’ करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला आम्ही मातीत गाडल्याशिवाय सोडणार नाही.
पाकिस्तान असो किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी बसलेले त्यांचे आका असोत, जर कोणी भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचा किंवा ‘गजवा-ए-हिंद’चा कट रचत असेल, तर त्यांना शोधून कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही सोडले जाणार नाही.
मुंबईतील शिवाजी पार्क येथील आंदोलनाबाबत बोलायचे झाल्यास, सीतामातेचा आणि हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या कुणाल कामरासारख्या कलाकाराचा विरोध त्या मंचावरील नेत्यांनी का केला नाही? सनातन धर्माचा अपमान होत असताना ते शांत का होते? म्हणून मी पुन्हा सांगतो, आमच्या हिंदू राष्ट्रात ‘गजवा-ए-हिंद’ करण्याचा प्रयत्न जो कोणी करेल, त्याला आम्ही मातीत गाडल्याशिवाय शांत बसणार नाही.”