संगमेश्वर : तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रशालेतील माखजन इंग्लिश स्कूल, माखजन तसेच ॲड. पी. आर. नामजोशी कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनोज शिंदे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
याप्रसंगी गौरव पोंक्षे, संजय सूर्यवंशी, सचिन साठे, पर्यवेक्षक अंबादास घाडगे व मुख्याध्यापक महादेव परब यांनी मनोगते व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मुख्याध्यापिका सौ. रुही पाटणकर, शिक्षक प्रतिनिधी महादेव शिंदे, शिक्षकेतर प्रतिनिधी नितीनराज दळवी आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष मनोज शिंदे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.
