चिपळूण : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सहकार्याने चिपळूण येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाला जिल्हा साहित्य संमेलनाचा मान मिळाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत पद्मश्री रमेशजी पतंगे हे संमेलनाध्यक्ष म्हणून लाभले आहेत. यानिमित्ताने नामवंतांची व्याख्याने, मुलाखत, काव्य संमेलन, पुस्तक प्रदर्शन इ. कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या साहित्य संमेलनात रत्नागिरी जिल्ह्यातील नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली स्वरचित कविता वाचनालयाच्या खालील पत्त्यावर पाठवावी. तसेच यासाठी खालील नियम व सूचना विचारात घ्याव्यात.
१. कविता कमीत कमी २० व जास्तीत जास्त ३० ओळींची असावी.
२. कविता सामाजिक आशयाची आणि स्वरचित असावी.
३. आपली कविता दिनांक ०५ नोव्हेंबर २०२६ पूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, बुरुमतळी, चिपळूण, पीन- ४१५६०५ या पत्त्यावर पाठवावी.
४. यातील निवडक कवितांच्या कवींना साहित्य संमेलनातील युवा कवी संमेलनात संधी देवून गौरवण्यात येईल तसेच त्यांना जाण्या येण्याचे एसटीचे प्रवास भाडे दिले जाईल. इतर सर्व सहभागी कवींना प्रशस्तीपत्र देण्यात येईल.
तरी रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयीन सर्व नवोदित कवींनी लवकरात लवकर आपली कविता या साहित्य संमेलनासाठी पाठवावी. तसेच १२ व १३ डिसेंबर २०२६ रोजी संपन्न होणाऱ्या जिल्हा युवा साहित्य संमेलनाला मोठया प्रमाणात उपस्थिती दर्शवावी असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
चिपळूण येथे होणाऱ्या जिल्हा युवा साहित्य संमेलनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयीन कवींना सुवर्णसंधी….
