रोहा ( प्रतिनिधी ) : शुक्रवारी सायंकाळी चंद्र दर्शन झाल्यानंतर पवित्र रमजान महिन्याची सांगता होणार असल्याने उद्या शनिवारी देशभरात मुस्लिम बांधव रमजान ईद साजरी करणार आहेत.ईद शांततेत व गुण्या गोविंद्यात साजरा करा, शांततेला गालबोट लागणार नाही या विषयी सर्वांनी विशेष दक्षता घ्यावी.
ईदच्या अनुषंगाने सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून ईदची नमाज अदा केल्यानंतर पोलीस प्रशासना कडून मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात येतील अशी माहिती रोहा पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले प्रभारी पोलीस निरीक्षक सुयश कुमार सिंग यांनी दिली.यावेळी उप निरीक्षक सूर्यकांत पवार आदीजण उपस्थित होते.
रमजान ईदच्या अनुषंगाने रोहा पोलीस ठाण्यात पोलीस प्रशासनाकडून मुस्लिम समाज बांधवांची तातडीने विशेष सभा घेण्यात आली.यावेळी पोलीस निरीक्षक सुयश कुमार सिंग व उप निरीक्षक सूर्यकांत पवार यांनी उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन केले.यावेळी जामा मस्जिदचे माजी अध्यक्ष जाफर भाई येरुणकर,अल खैरिया कमिटी अध्यक्ष शफी भाई पानसरे,सचिव मुबीन कर्जिकर,अष्टमी जमात अध्यक्ष जमीर कर्जिकर,खजिनदार यासीन पानसरे,सहसचिव समीर चोरडेकर,सदस्य मजीद पठाण,राहील नागोठकर, अकील फौजे,रोहा जामे मस्जिद कमिटी सचिव अनिस मोरबेकर,सदस्य जुबेर चोगले, नद्दीम सिद्धिक,वरचा मोहल्ला सदस्य फरहान खामकर, इलियास डबीर तसेच न्हावे,खैरेखुर्द इत्यादी भागातील मुस्लिम समाजातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
