मुंबई : प्रसिद्धी माध्यमांच्या पत्रकारांशी वेळोवेळी संवाद साधण्यासाठी भाजपाचे माजी आमदार व प्रवक्ते अतुल शाह यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेला ‘चॅनेल बूम स्टँड’ आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना प्रदान करण्यात आला.

अतुल शाह यांनी याआधी महाराष्ट्र विधानभवन व भाजपा प्रदेश कार्यालयातही अशा प्रकारचे ‘चॅनेल बूम स्टँड’ दिलेले आहेत.

प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी हा ‘चॅनेल बूम स्टँड’ उपयुक्त आहे, असे रविंद्र चव्हाण यांनी याप्रसंगी सांगितले.

सदर छोटेखानी समारंभाला प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रवक्ते पंकज मोदी आणि अध्यक्षांचे माध्यम समन्वयक गोविंद येतयेकर उपस्थित होते.