चिपळूण-: येथील पत्रकार श्री.राजेंद्रकुमार शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती मालतीबाई महादेवराव शिंदे यांचे आज गुरुवारी सकाळी १०:३० वाजता प्रभात गल्ली बाजारपेठ येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८७ वर्षे वयाच्या होत्या.

आज सायंकाळी सात वाजता त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. रामतीर्थ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात विजय आणि राजेंद्रकुमार हे दोन सुपुत्र, चार विवाहित कन्या, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

अत्यंत धार्मिक वृत्तीच्या मालतीताई या वारकरी होत्या. त्यांच्या निधनामुळे चिपळूणमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन करून दुःख व्यक्त केले.