चिपळूण : तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के यांनी आज मंगळवारी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. श्री. जयकुमार गोरे, बंदर व मस्य विभाग मंत्री मा. श्री. नितेशजी राणे व भाजपा युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक यांची भेट घेतली.
यावेळी चिपळूण तालुक्यातील विविध विषयांवर सरपंच यांना येणाऱ्या अडचणी व विकासात्मक मुद्यावर चर्चा केली. तसेच पुढील चर्चा करण्यासाठी तालुक्यातील सर्व सरपंच यांना मुंबई येथे वेळ मिळावी या अनुषंगाने भेट मिळावी, अशी विनंती करण्यात आली. यावेळी चिपळूण नगरसेवक परिषदेचे आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेवक संदिप भिसे, रत्नदीप देवळेकर, विजय चितळे अमोल तटकरे आदी उपस्थित होते.
