खेड : खेड-दापोली मार्गालगत मौजे फुरूस येथे गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी खेड पोलिसांनी २९ वर्षीय तरुणाला रंगेहाथ पकडले. ही कारवाई १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.४७ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
मक्लेन अस्लम अंतुले (वय २९, सध्या रा. भोरले जलालशहा मोहल्ला, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ३२० ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा, एक Suzuki Access 125 स्कूटर आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ६ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
जप्त मुद्देमालामध्ये १६ हजार रुपये किमतीचा ३२० ग्रॅम गांजा, ९० हजार रुपये किमतीची पीआरएल मूनस्टोन ग्रे रंगाची सुझुकी कंपनीची एक्सेस १२५ स्कूटर आणि ३ हजार ५० रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सोहेल इकबाल ढगे (ब.नं. २५८), खेड पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली. आरोपीविरुद्ध गुन्हा रजि. नं. ३१५/२०२६ अन्वये अंमली औषधी द्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ मधील कलम ८(क), २०(ब)(ii)(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.