खेड : तालुक्यातील चाकाळे हनुमाननगर येथे जुन्या वादाचा राग मनात धरून एका व्यक्तीला शिवीगाळ करून बांबूच्या काठीने मारहाण केल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. या मारहाणीत राजेश सखाराम कदम (वय ४५, रा. चाकाळे हनुमाननगर, ता. खेड) हे जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश कदम हे चाकाळे हनुमाननगर येथील ललिता घाणेकर यांच्या भाड्याच्या घरासमोर बसले होते. यावेळी मागील वादाचा राग मनात धरून दिशक पांडुरंग भिलारे, पुष्या पांडुरंग भिलारे आणि दिशक पांडुरंग भिलारे यांचा मुलगा (नाव माहीत नाही), रा. चाकाळे जगदिशनगर यांनी कदम यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना मारण्याची धमकी देत आरोपी क्रमांक एक याने सोबत आणलेल्या बांबूच्या काठीने कदम यांच्या डोक्यावर, दोन्ही हातांवर, पाठीवर व छातीवर मारहाण केली. या घटनेत कदम जखमी झाले.
याप्रकरणी राजेश सखाराम कदम यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा रजि. नं. ३१४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.