जळगाव:- जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहेत. यावर पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
त्या म्हणाल्या की, आजच्याच दिवशी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी २२ निष्पाप जीवांचा बळी घेतला. या निष्पाप जीवांमध्ये कोणी तरी आयुष्याची नवी सुरुवात केली होती, कोण आपल्या कुटुंबासोबत निवांत क्षण घालवण्यासाठी गेले होते पण त्यांच्या आनंदाच्या चिंधड्या चिंधड्या केल्या गेल्या.
