चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आज सकाळपासूनच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खेर्डी येथील त्यांच्या निवासस्थानी हितचिंतकांनी गर्दी केली.
कोकणातील सहकार क्षेत्रात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची अत्यंत वेगाने घोडदौड सुरु आहे. संस्थेचे संस्थापक चेअरमन व प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ श्री. सुभाषराव चव्हाण यांच्या कन्या उच्चविद्याभूषित सौ. स्वप्ना यादव यांनी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पतसंस्थेचा आणि त्या माध्यमातून गुंतवणूकदार, सभासद, खातेदार या सर्वांचाच वेगाने विकास होऊ लागला आहे. पतसंस्थेच्या सीईओ पदाची धुरा त्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्याचप्रमाणे, वाशिष्टी डेअरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या त्या मुख्य प्रवर्तक आहेत. या दोन्ही संस्था लोकाभिमुख होण्यासाठी सौ. यादव यांचे मोठे योगदान आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांत यादव यांच्या सहधर्मचारिणी असलेल्या सौ. स्वप्ना यादव या पक्षवाढीसाठीही मेहनत घेत असून त्यांच्या सुयोग्य रणनीतीमुळे नगरपालिकेत भाजपला घवघवीत यश मिळाले. महिला संघटना मजबूत करण्यासाठी सौ. यादव यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे.
सहकार, सामाजिक, राजकारण, उद्योग अशा सर्व क्षेत्रांत स्वतःचा लौकिक निर्माण करणाऱ्या स्वप्ना यादव यांचा वाढदिवस त्यांच्या शेकडो हितचिंतकांसाठी आनंदाची पर्वणी ठरला आहे. त्यांनी आजवर केलेल्या सहकार्यामुळे अनेक कुटुंबे सावरली असून महिला सक्षमीकरणातील त्यांचे कार्य अतुलनीय ठरते. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे आज वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
