खेड : महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना. श्री. योगेशदादा कदम यांनी नुकतेच शिवसेना प्रणित नवरात्रौत्सव मधील खेडच्या माऊलीचे मनोभावे दर्शन घेतले व विधिवत पूजाअर्चा केली.
यावेळी खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. माधवी राजेश बुटाला, शिवसेना महिला आघाडी शहर संघटक सौ. नेहा दळी यांच्यासह नगरसेविका सौ. संजना कुडाळकर, सौ. कल्पना पाटणे, सौ. रश्मी कानडे, सौ. अक्षदा दळवी, सौ. संपदा गुजराती, श्रेया जोशी आदी मान्यवर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
दर्शनानंतर बोलताना ना.श्री.योगेशदादा कदम यांनी खेडची माऊली सर्वांना सुख, समृद्धी देवो अशी प्रार्थना केली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
खेडच्या माऊलीच्या दर्शनासाठी गृहराज्यमंत्र्यांची उपस्थिती…!
