चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री. उदय सामंत यांनी “हरी ओम सतनाम वारकरी संप्रदायाचे “रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ह.भ.प.श्री. अरविंदमहाराज चव्हाण यांचा रत्नागिरी येथील पाली येथील पालकमंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी नुकताच हा सत्कार समारंभ पार पडला.नुकतेच अरविंदमहाराज चव्हाण यांना कोल्हापूर येथील,” जन कल्याण समिती संस्थेच्या “वतीने “वारकरी भूषण ” यासन्मानाने सन्मानित करण्यात आले.
“वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्र राज्याची वैचारिक शिदोरी आहे,तूम्हा मंडळींचा आम्हांस सार्थ अभिमान आहे “असे उद्गार यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले. “रत्नागिरी जिल्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित होणे माझ्यासाठी खुप प्रेरणादायी बाब असून हा सत्कार कायम स्मरणात राहील ” असे उद्गार या प्रसंगी अरविंद महाराज चव्हाण यांनी काढले.
