रत्नागिरी : “आज राजेंद्र आयरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या अचानक निधनाने जयंती निमित्त रक्तदान शिबिर घेण्याची वेळ आपल्यावर आली ही दुःखदायक गोष्ट आहे,आयरे साहेब हे चळवळीतील आदर्शवत नेतृत्व आपणास अजुन हवे होते त्यांच्या समवेत काम करताना खुप प्रेरणा मिळाली, त्यांचे कार्य कायम प्रेरणादायी आणि अजरामर ठरेल,आज त्यांच्या जयंतीदिनी ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यामुळे रुग्णांना नवीन जीवनदान मिळेल हेच खरे श्रेष्ठदान ठरेल, असे मनोगत रत्नागिरी नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष मिलींद किर यांनी व्यक्त केले.”
बहुजन समाज पार्टीच्या वतीने प्रतिवर्षी प्रदेश सचिव राजेंद्र आयरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात येते, आयरे साहेबांच्या अचानक निधनामुळे जयंती निमित्त रक्तदान शिबिर शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीत आयोजित करण्यात आले होते.
रक्तदात्यांनी खुप उत्स्फूर्तपणे चांगले सहकार्य केले, रक्तदान शिबीर प्रसंगी रत्नागिरी नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष मिलींद किर, तैलिक समाज सेवा संघांचे तालुकाध्यक्ष सचिन लांजेकर, भारतीय बौध्द महासभेचे माजी तालुकाध्यक्ष रत्नदिप कांबळे, थिबा राजा कालीन संघर्ष समितीचे जेष्ठ धडाडीचे कार्यकर्ते दिवेन कांबळे , अँड. प्रविण कांबळे, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्र प्रभारी अनिकेत पवार, बसपा रत्नागिरी विधानसभा अध्यक्ष राजेश सावंत, प्रभारी किशोर पवार ,उपाध्यक्ष अनंत पवार, कोषाध्यक्ष दिपक आयरे, सचिव राकेश पवार, वाटद सेक्टर चे सुहास पवार, चांदेराई सेक्टरचे दिपक कांबळे, अशोक नगर चे महेश कांबळे, कल्पेश हातखंबेकर,मोहीतेअँब्युलेन्स सर्व्हीस चे किशोर मोहीते उपस्थित होते.
शासकीय रक्तपेढी चे डाँ. सुरज निकम,रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी मधुरा भोसले, डाँ.स्नेहा भोसले,इनचार्ज सुवर्णा जोशी, टेक्निशियन भारती भोसले, परिचारिका जयश्री कुंडलकर आणि दिप्ती जाधव, थूळ या सर्व स्टाफ चे चांगले सहकार्य मिळाले.
राजेंद्र आयरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर; रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद…“रक्तदात्यांनी केलेले रक्तदान रुग्णांसाठी नवीन जीवनदान ठरेल” – मिलिंद किर..
