मुंबई : ४ ते ७ डिसेंबर दरम्यान समुद्रात मोठी भरती येण्याचा अंदाज हवामान विभागाने व आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत ४.५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यांच्या अत्यंत जवळ जाणे टाळावे, अशा सूचना प्रशासनाने जारी केल्या आहेत. विशेषतः ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजून ३९ मिनिटांनी ५.०३ मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
