लवेल :कुणबी सेवा संघ, लवेल विभागाच्या समाजमंदिरासाठी आज दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी घराडा कंपनीच्या CSR निधीतून बोअरवेलचे काम करण्यात आले. या कामासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मा.खेड तालुकाध्यक्ष श्री. संदीप हरी फडकले व कुणबी सेवा संघांचे आजी / माजी पदाधिकारी यांनी सातत्याने पाठपुरावा करून अथक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने समाजमंदिरासाठी पाण्याची महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध झाली आहे.
समाजमंदिर हे समाजाच्या विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे केंद्र असून, येथे पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे समाजबांधवांची मोठी सोय होणार आहे. या कामासाठी CSR निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल घराडा कंपनीचे तसेच या कामासाठी विशेष प्रयत्न करणारे श्री. संदीप हरी फडकले यांचे समाजाच्या वतीने कौतुक व आभार व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी कुणबी समाजोन्नती संघ, खेडचे अध्यक्ष श्री. कृष्णा आग्रे (गुरुजी), (कुणबी सेवा संघ लवेल अध्यक्ष ),श्री. दीपक शिगवण, माजी अध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा राणे, माजी अध्यक्ष श्री. डॉ. श्रीकांत चांदिवडे, उपाध्यक्ष श्री. गंगाराम इप्ते, श्री. बाबाराम पाडावे, श्री. सुनील घाणेकर, श्री. अनंत भागाने, श्री. अजय शिगवण, श्री. प्रवीण नायनाक, श्री. चंद्रकांत पाटील, श्री. दिनेश म्हादलेकर, श्री. श्रीकांत फडकले, श्री. रवी बाईत, श्री. वसंत नायनाक व श्री. गणपत आग्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
या महत्त्वपूर्ण कामासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, उपस्थित समाजबांधवांचे तसेच घराडा कंपनीचे कुणबी सेवा संघ लवेलचे अध्यक्ष श्री. दीपक शिगवण यांनी आभार मानले.
समाजाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न आणि लोकसहभागातून झालेली ही सुविधा निश्चितच कौतुकास्पद असून, यामुळे समाजमंदिराच्या पुढील सामाजिक कार्याला अधिक बळ मिळणार आहे.
