चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा लौकिक आणि कारभार संपूर्ण देशभर पोहोचविण्यासाठी अशीच अखंड, अतूट साथ द्या असे आवाहन कोकणातील नामवंत अर्थतज्ज्ञ आणि चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुभाषराव चव्हाण यांनी आपल्या ७९ व्या वाढदिवशी हितचिंतकांकडून सदिच्छा स्वीकारताना केले तेव्हा उपस्थितांनी “चव्हाण साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशा गगनभेदी घोषणा देऊन आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून सभागृह दणाणून सोडले आणि चव्हाण साहेबांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
चिपळूण बहादूरशेखनाका येथील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवन सभागृहात अभिष्टचिंतन सोहळा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संचालिका सौ. स्मिता चव्हाण, सेवानिवृत्त अप्पर आयुक्त एस. बी. पाटील, माजी सहनिबंधक, लेखा परीक्षण महाराष्ट्र राज्य पुणेचे तानाजी कवडे, व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालक सुर्यकांत खेतले, गुलाब सुर्वे, रवींद्र भोसले, मनोहर मोहिते, सत्यवान म्हामुनकर, राजेश वाजे, राजेंद्र पटवर्धन, प्रकाश साळवी, प्रकाश पत्की, प्रमोद साळवी, सोमा गुढेकर, ऍड. नयना पवार, श्रीमती निलिमा जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी संस्थेच्या संचालिका तथा सुभाषराव चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी सौ. स्मिता चव्हाण यांनी औक्षण केले. नंतर सुभाषराव चव्हाण यांनी आपल्या वाढदिवसाचा केक कापला. तर मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी केक भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यानंतर चिपळूण सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळासह चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्षा सौ. रुपाली दांडेकर, भाजपा गटनेते शशिकांत मोदी, नगरसेवक शुभम पिसे, निहार कोवळे, अंकुश आवले, चिपळूण अर्बन बँकेचे चेअरमन मोहन मिरगल, संचालक रत्नदीप देवळेकर, समीर जानवलकर, निहार गुडेकर, माजी संचालक सतीश खेडेकर, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे रत्नागिरी माजी जिल्हाध्यक्ष सचिन कदम, जिल्हा परिषद सदस्य सौ. दीप्ती महाडिक, पंचायत समिती सदस्या सौ. सायली वाजे, सौ. सुप्रिया देवरुखकर, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती विजय देसाई, चिपळूण नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी मंगेश पेढांबकर, खेडचे पंचायत समिती माजी सभापती विजय कदम, निलेश भुरण, रुपेश आवले, जयंत शिंदे, अनिल लांजेकर, भाजपा महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्ष सौ. आदिती गुढेकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, विक्रांत पवार, विजय रतावा, नगरसेविका सौ. उमा देसाई, उदय देसाई, सौ. रुही खेडेकर, सौ. संगीता पालकर यांच्यासह यादव व चव्हाण कुटुंबीयांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
