चिपळूण : तालुक्यातील पेढे फरशी पुलाखालील रस्त्यावर खडड्यांचे साम्राज्य पसरले होते याची माहिती शिवसेना चिपळूण नूतन तालुकाप्रमुख दिलीप चव्हाण यांना मिळताच ते आपल्या सहकाऱ्यां सोबत त्याठिकाणी पोहचले.
त्यांनी तात्काळ राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना तेथे बोलावून तेथील विदारक चित्र दाखवून नागरिकांच्या जीवितास असणारा धोका आणि गैरसोय लक्षात आणून दिली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी श्री खुणेकर यांनीही तत्परतेने कार्यवाही करून तेथील परिसर खड्डेमुक्त करून दिला.
दिलीप चव्हाण यांनी तत्परतेने याबाबत दखल घेऊन समस्या मुक्त केल्याबद्दल नागरिकांनी आभार व्यक्त केले. यावेळी त्यांच्या सोबत पेढे येथील शिवसेना पदाधिकारी जनार्दन मालवणकर उपस्थित होते.
शिवसेना नूतन तालुकाप्रमुख दिलीप चव्हाण यांच्या तत्परतेने पेढे-फरशी पुलाखालील खड्डे तात्काळ भरले ; नागरिकांमधून समाधान…
