लांजा:

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या सोमवार दि. ९ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या निकालाने अखेर प्रतीक्षा संपुष्टात आली. लांजा तालुक्यात शिंदे शिवसेना व उबाठा शिवसेना अशीच खरी लढत निकालामध्ये पहायला मिळाली. जाहीर झालेल्या निकालामध्ये शिंदे सेनेने जिल्हा परिषदेच्या चार व पंचायत समितीच्या आठ अशा एकूण बारा जागांवर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे पुन्हा एकदा लांजा पंचायत समितीवर शिंदे शिवसेनेला एकहाती सत्ता काबीज करण्यात यश आले आहे.
जाहीर झालेल्या निकालात शिंदे शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या ४ तर पंचायत समितीच्या १२ जागांपैकी ११ गण शिंदे सेनेने बळकावल्या आहेत. तर भाजपने १ जागा मिळवली आहे. शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुती व स्वबळावर उतरलेल्या उबाठा शिवसेना यांच्यामध्ये प्रचारापासून जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र शिंदे शिवसेनेने जि प व पंचायत समितीवर एकहाती निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. दरम्यान लांजा नगरपंचायत निवडणुकीत घवघवित यश मिळवल्यानंतर पुन्हा एकदा जि प आणि पं स निवडणुकीतही लांजा-राजापूरचे आमदार किरण उर्फ भैया सामंत किंग मेकर ठरले आहेत.
निकालाच्या सुरवातीपासूनच टपाल मतांनी आघाडी घेत शेवटपर्यंत मतांचा आकडा वाढत गेला व मोठ्या मताधिक्यांनी शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांनी विजयी यश संपादन केले. महायुतीने सर्वच जागांवर निर्विवाद यश मिळवताच शिंदेसेना व भाजप व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. जिल्हा परिषद गट व पंचायत समितीनिहाय उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे-

जि प गट आसगे:
अनन्य अभिजित राजेशिर्के- ३६१३, मनीषा गणेश लाखण- ५६२२ यामध्ये मनीषा लाखण या २००९ मताधिक्याने विजयी ठलेल्या.

पं स गण आसगे:
मानसी सिद्धेश्वर आंबेकर (शिंदे शिवसेना) – ३२२२, श्रावणी कांबळे- १९६, आसावरी किशोर मांडवकर- १३५१ यामध्ये १८७१ मताधिक्याने मानसी आंबेकर या विजयी झाल्या.

पं स गण वेरवली खुर्द:
साक्षी चव्हाण (शिंदे शिवसेना)- २७२३, निलिमा जाधव (उबाठा शिवसेना)- १५६६, मानसी पवार- २१५ यामध्ये साक्षी चव्हाण या ११५७ मतांची आघाडी घेत साक्षी चव्हाण विजयी ठरल्या.

जि प गट भांबेड:
विनिता गांगण (शिंदे शिवसेना) -४९६६, अचला विश्वासराव ३७५४, गटातून १२१२ मतांच्या घाडीने विनिता गांगण विजयी झाल्या.

पं. स गण प्रभानवल्ली:
आनंद बाबू कांबळे २२२, राजेंद्र घडशी १२८१, उमेश अरुण पत्की (शिंदे शिवसेना) २६२१, संकेत घाग १४३, यामध्ये शिंदे सेनेचे उमेश पत्की हे १३४० मतांची आघाडी घेत निवडून आले.

पं स गण भांबेड:
शैलेश मनोहर खामकर (भाजप)- २१४४, किरण रेवाळे- ३७९, युवराज हांदे(उवाठा शिवसेना)- १८९८, सचिन बेर्डे- ११८ यामध्ये २४६ मतांनी भाजपचे शैलेश खामकर हे विजयी ठरले.

जि प गट साटवली:
लीला मोहन घडशी (शिंदे शिवसेना)- ६१६९, मनीषा अनोज जाधव (काँग्रेस)- २०८१ यामध्ये ४०८८
मतांची आघाडी घेत सेनेच्या लीला घडशी या विजयी झाल्या. तर

पं स गण वाकेड:
रसिका मेस्त्री (शिंदे शिवसेना)- २९१७, दक्षता राजापकर (उबाठा) – ११२८ यामध्ये शिवसेनेच्या रसिका मेस्त्री या १७८९ आघाडी घेऊन विजयी झाल्या.

पं स गण साटवली:
आदेश दत्तात्रय आंबोळकर(शिंदे शिवसेना)- २२४६, रमेश रामभाऊ कदम-१८६५, उज्वल बाळकृष्ण पवार- १२२ यामध्ये आदेश आंबोळकर हे ३८१ आघाडी घेऊन विजयी झाले.

जि प गट गवाणे:
आनंद बाबूं कांबळे-५६३, चेतन शांताराम दळवी-३८७६, संतोष कृष्णा रेवाळे (शिंदे शिवसेना) – ६२७४ यामध्ये संतोष रेवाळे हे २३९८ मतांची आघाडी घेत निवडून आले.

पं स गण खानवली:
चंद्रकांत शांताराम गितये १८७, प्रथमेश रमेश बोडेकर २८४, लक्ष्मण सोनू मोर्ये २०९४, यशवंत देऊ वाकडे (शिंदे शिवसेना) २५०२, संजय वासुदेव रेवाळे १९७ यामध्ये यशवंत वाकडे हे ४०८ मंतांच्या आघीडीने निवडून आले.

पं स ग गवाणे:
दिपाली जयवंत साळवी (शिंदे शिवसेना) ३४४६, पायल प्रशांत साळवी १९०६ यामध्ये दिपाली साळवी या १५४० मतांची आघाडी घेऊन विजयी ठरल्या.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वंदना खरमाळे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रियांका ढोले, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून हिंदुराव गिरी यांनी काम पाहिले. मतमोजणी केंद्राच्या बाहेर व लांजा शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी १० वाजता सुरु करण्यात आलेली निकाल प्रक्रिया दुपारी २.३० वाजता संपुष्टात आली.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY