मंडणगड : पारंपरिक पद्धतीने मूर्ती निर्मिती करण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फायबरग्लास मूर्ती निर्मितीचा अभिनव प्रयोग पाले येथे विजय दुर्गवले यांनी केला आहे. या क्षेत्रात विविध अडचणी व संकटाना सामोरे जात स्वयंरोजगारासह नवनिर्मीचा प्रयत्न ते करीत आहेत त्यांच्या या वेगळ्या उपक्रमामुळे मूर्तीकलेच्या क्षेत्रात त्यांनी नवी वाट चोखाळली आहे.
फायबरग्लासपासून मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तीचा साचा तयार करून त्यामध्ये फायबर मॅट व राळेचे थर देण्यात येतात. त्यानंतर मूर्तीला आवश्यक आकार, मजबुती व आकर्षक रंगसंगती देऊन अंतिम स्वरूप दिले जाते. फायबरच्या मूर्ती तुलनेने हलक्या आणि टिकाऊ असल्याने विविध प्रकारच्या मूर्ती व कलाकृतींसाठी या तंत्राचा वापर केला जातो.
विजय दुर्गवले यांनी पाले येथे हा प्रयोग प्रत्यक्षात आणत पारंपरिक मूर्तीकलेसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घातली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, स्थानिक पातळीवर मूर्ती निर्मितीच्या नव्या संधी निर्माण होण्यास या प्रयोगामुळे चालना मिळू शकते.
पाला येथे फायबरग्लास मूर्ती निर्मितीचा अभिनव प्रयोग; विजय दुर्गवले यांनी चोखाळली वेगळी वाट…
