मंडणगड : मंडणगड तालुक्यातील तिडे, निमदेवाडी येथील लक्ष्मी पांडुरंग निमदे (वय ६५) यांचा जंगलातील विषारी फळ खाल्ल्याने प्रकृती बिघडून उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद मंडणगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलीसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी पांडुरंग निमदे यांना जंगलातील फळ खाल्ल्याने त्रास होऊ लागल्याने य २८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता ग्रामीण रुग्णालय, मंडणगड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ग्रामिण रुग्णालयात त्यांच्यावर १ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उपचार सुरू होते.
मात्र, प अधिक उपचारांची आवश्यकता असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आले त१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांना रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
दरम्यान, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे २.११ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद मंडणगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, याबाबतची मयत महिलेचा मुलगा प्रकाश निमदे यांनी फिर्याद दिल्याने ७ ऑक्टोबर २०२६ आमृ क्रमांक १९/२०२६ बी.एन.एस.एस.१९४ नुसार खबर नोंद करण्यात आली आहे
जंगलातील विषारी फळ खाल्ल्याने तिडे येथील लक्ष्मी निमदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू जिल्हा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास..
