मुंबई -राज्यसरकारने दुष्काळाबाबत एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या निकषापलीकडे जाऊन या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सरकारने पाच हजार रुपये मदत सुरुवात म्हणून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देऊ केली आहे. पाच हजार रुपये मदत ही अंतिम मदत नाहीय हे लक्षात घ्या असे सांगतानाच हे महायुतीचे सरकार असून बळीराजाच्या पाठीशी ठाम उभे आहे शिवाय शेतकऱ्यांना मदतीचा हात नक्की देणार आहे हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

दुष्काळाबाबत मुख्यमंत्र्यांनी व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपली स्पष्ट भूमिका वारंवार मांडली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखालील उपसमितीनेही मांडली आहे. राज्यसरकार शेतकऱ्यांना ठोस पध्दतीची मदत देईल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला.