चिपळूण:- चिपळूण येथे शनिवार 17 ऑक्टोबर 2026 रोजी हिंदू जनजागृती समिती ने रौप्य महोत्सवी वर्षात प्रवेश केला या निमित्ताने चितळे मंगल कार्यालय येथे हिंदुत्वनिष्ठ यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी हरी ओम सतनाम वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. शांताराम नवेले महाराज , सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सदगुरू सदगुरू सत्यवान कदम, मंदिर महासंघाचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री संजय जोशी यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती लाभली होती. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
यावेळी 24 वर्षांपूर्वी हिंदू जनजागृती समितीच्या स्थापनेच्या प्रसंगात कृतिशील सहभाग असलेले आर्य ग्रुपचे श्री. उदय ओतारी, श्री. प्रसन्ना आवले, श्री. मनोज जाधव तसेच नरेंद्र महाराज संप्रदायचे माजी नगरसेवक अरविंद वरवडेकर, वि.ही.प.चे जिल्हा मंत्री श्री. उदय चितळे, हिंदुत्वनिष्ठ श्री. किशोर कडवेकर, उद्योजक श्री. अमोल जोगळेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. राहुल पुरोहित यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन आदित्य तांबे यांनी केले. हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक अमित जोशी, प्रशांत उतेकर, चिपळूण नगर परिषदे चे पाणी सभापती निहार कोवळे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे देवव्रत तांबे, अजिंक्य ओतारी, रा. स्व. संघ चे राजेश सोहनी, विहिप चे पराग ओक, कालभैरव सांस्कृतिक मंचचे श्री उदय सलागरे, श्री विंध्यवासीनी देवस्थानचे अध्यक्ष महेश पोंक्षे, राजे प्रतिष्ठान गोवळकोटचे अभय जुवळे, सकल हिंदू समाज चे राजेश ओतारी
अधिवक्ता मिलिंद तांबे आदी उपस्थित होते