कोल्हापूर / चिपळूण – गोकुळ दूध संघाच्या बहुचर्चित निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने १६ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला असून सत्ता काबीज केली आहे. महायुतीला ९ जागांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत गोकुळच्या ३ माजी अध्यक्षांचा पराभव झाला असून नाविद मुश्रीफ, विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर माजी आमदार शौमिका महाडिक यांचा अवघ्या ७ मतांनी पराभव झाला.
या विजयात चिपळूणकरांसाठी अभिमानाची बाब म्हणजे चिपळूणशी नाते असलेल्या दोन उमेदवारांनी बाजी मारली आहे.
. अभिजीत तायशेटे – हे चिपळूण नगरपरिषदेच्या नगरसेविका रसिका ताई देवळेकर यांचे बंधू असून त्यांनी गोकुळ निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे.
. रणजीत पाटील – हे चिपळूणचे माजी नगरसेवक समीर भास्करराव जाधव यांचे मेहुणे आहेत. त्यांनी देखील गोकुळमध्ये विजय संपादन केला आहे.
या दोन्ही विजयी उमेदवारांचे चिपळूण शहरातून अभिनंदन होत आहे.
