खेड : तालुक्यातील व मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणा नाका येथील बालाजी हाॅटेल ते टीबीजे काॅलेजकडे जाणा-या मार्गावरील रस्त्यावर झाड कोसळल्याने वहातुक ठप्प झाली होती. या घटनेची दखल घेत वन विभाग, महसूल विभाग, ग्रामपंचायत भरणे व कर्मचारी, स्थानिक लोकप्रतीनिधी व ग्रामस्थ यांच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यात आला असून, ठप्प झालेली वहातुक पुर्वरत सुरु झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. हि घटना सोमवार दि. 19 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.