खेड : तालुक्यातील चिंचघर प्रभुवाडी येथील भैरवनाथ देवस्थान राज्य प्रादेशिक पर्यटन स्थळ येथे नवरात्र उत्सव निमित्त शिवसेना उपनेते, माजी आमदार संजयराव वसंतराव कदम यांच्या संकल्पनेतून व भैरवनाथ मंदिर कमिटी यांच्या सहकार्यातून आयुष होमोपैथिक योगा यांच्या अधिपत्तेखाली जनतेसाठी महत्त्वाचे असे योगासन महाशिबिर आयोजन केले होते.
यावेळी शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असं योगासन याचा उपयोग काय ? हे डॉक्टर सौ.वैष्णवी विक्रांत पाटील व डॉ. विक्रांत पाटील यांनी महाशिबिरात योगासन दाखवून पटवून दिले.या शुभप्रसंगी देवस्थान कमिटीच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला. भैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष प्रदोष उर्फ भाई कडू, उपाध्यक्ष शिवाजी शेलार,खजिनदार अशोक कडू, सचिव रुपेश महाडिक, सहसचिव दत्ता पवार, ग्रामसेवक किशोर क्षिरसागर, तसेच दस्तुरी शाळा व प्रभुवाडी शाळेतील शिक्षक व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.