चिपळूण : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेच्या शाखा लांजा या बवाशीवाडा येथे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. प्रभाकरजी आरेकर यांच्या शुभहस्ते, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष मा. श्री. सुरेशजी साळुंखे व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना प्रामाणिकपणे काम केल्यास सहकार क्षेत्र प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वाचे क्षेत्र असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रभाकरजी आरेकर यांनी प्रतिपादन केले. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून निवृत्त झाल्यानंतर सहकारात काम करताना याचप्रकारे संस्था चालवावी व सर्वांना आर्थिक सहकार्य करून त्यांची प्रगती साधावी या हेतूने संस्थेची स्थापना केल्याचे सांगितले.
सभासद व ठेवदारांनी गुंतवणूक करताना डोळसपणे केल्यास आर्थिक नुकसान होणार नाही तसेच संस्थेचे कामकाज विश्वासार्हता, पारदर्शकता, सुरक्षितता व व्यावसायिकता यानुसार केले असल्यामुळे संस्थेने अल्पावधीत नाव लौकिक मिळविल्याचे नमूद केले.
यावेळी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष श्री. सुरेशजी साळुंखे यांनी संस्थेच्या कामकाजाचे व प्रगतीचे कौतुक करून संस्थेला शुभेच्छा दिल्या.
तसेच लांजा तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष श्री. सुभाषजी लाखण व संचालक श्री. सुभाषजी पवार, लांजा नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष सौ. संपदा वाघधरे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवृत्त अधिकारी श्री. विनायक नार्वेकर यांनी संस्थेला शुभेच्छा देताना संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.
संस्थेच्या लांजा शाखा शुभारंभासाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. महेशजी खामकर, चिपळूण नगरपरिषदेचे नगरसेवक श्री. मिथिलेशजी नरळकर, लांजा नगरपंचायतीचे नगरसेवक श्री. पंढरीनाथ माईशेट्ये, राजापूर अर्बन बँकेचे अधिकारी श्री. बिर्जे व शाखाधिकारी सौ. अंकिता जायदे, चिपळूण अर्बन बँकेचे श्री. शेट्ये यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. हेमचंद्र हळदणकर, संचालक श्री. दिलीप मयेकर, पराग आरेकर, उदय वेल्हाळ, संचालिका सौ. सविता आरेकर, श्रीमती प्रज्ञा नरवणकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. राजुभाऊ राणे, श्री. योगेशजी वाघधरे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अधिकारी श्री. पांडुरंग जाधव, बापू शिंदे, मुकेश कांबळे, विनायक नार्वेकर, लांजा खरेदी-विक्री संघाचे श्री. महादेव खानविलकर, सचिव श्री. गुरव, सौ. रागिणी आरेकर, श्री. प्रतीक सुर्वे, संस्थेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच असंख्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे व्यवस्थापक श्री. संदीप रहाटे यांनी केले.
