लांजा : तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. दर्शना दीपक चव्हाण यांच्या महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय, कौशल्य विकास आणि जनजागृती या क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची दखल घेऊन आसरा सोशल फाउंडेशन पुणे व ओम पब्लिकेशन यांच्या वतीने उत्कर्ष भारत सन्मान देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला असून हा कार्यक्रम शनिवार दि.२६ रोजी पुणे येथील पत्रकार भवन येथे संपन्न झाला
सदरचा पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस व ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
सौ. दर्शना चव्हाण या सातत्याने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्या आहेत. ग्रामीण भागातील महिला, किशोरी, विद्यार्थी आणि गरजू नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती, कायदेविषयक मार्गदर्शन, आरोग्य जनजागृती आणि स्वावलंबनाचे प्रशिक्षण देऊन समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आल्याने त्यांचे तालुक्याभरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
लांजातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. दर्शना चव्हाण यांच्या कार्याचा गौरव…पुणे येथे संस्थेचा उत्कर्ष भारत सन्मान प्रदान…
