लांजा : विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना विचार पूर्वक निवडावे यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास व ध्येयासक्ती आवश्यक आहे. — प्राध्यापक मिलिंद कडवईकर.
लांजा : कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित, लांजा यांच्या वतीने कुलकर्णी काळे छात्रालय, लांजा येथे विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला. शिक्षण, कला, कृषी व इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, गौरवपत्र व भेटवस्तू म्हणून भारताचे संविधान.,
देऊन गौरव करण्यात आला. तसेच भारतीय संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावीत या उद्देशाने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची प्रत भेट स्वरूपात प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमात तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच कुणबी समाजातील इयत्ता दहावीमध्ये 80 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या आणि इयत्ता बारावीमध्ये 70 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय पदवी, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी, शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.

यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात बी.ए.एम.एस. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या डॉ. आकांक्षा सनगरे, राज्य शासनाचा कृषी क्षेत्रातील वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार प्राप्त श्री. दयानंद चौगुले, राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल कु. ईश्वरी सुवारे तसेच राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यीनी आरोही शिंदे या सर्वांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. मिलिंद कडवईकर यांनी विद्यार्थ्यांनामार्गदर्शन करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना विचार पूर्वक निवडावे आपली आवड,क्षमता,व भविष्यात असणाऱ्या संधी यांचा मेळ घातला जाणे आवश्यक आहे.लहानवयातच आपलीआवड ओळखली रे भविष्यात यशस्वी होणे फार कठीण नाही.त्यांनी पुढे विविध करिअर पर्यायांची माहिती दिलीच शिवाय आवश्यक असलेल्या सीईटी तसेच स्पर्धा परीक्षा यासाठी आवश्यक तयारी कशी करावी याची सविस्तर माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत परवडी यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत परवडी, उपाध्यक्ष श्री. विलास दरडे, संचालक श्री. शांताराम गाडे, श्री. नंदकुमार आंबेकर, श्री. भालचंद्र कांबळे, संचालिका सौ. दर्शना बेंद्रे, सौ. प्रज्ञा हरमले, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदिप डाफळे, शाखाधिकारी श्री. संतोष घडशी, श्री. गंगाराम कालकर, श्री. सचिन रामाणे, श्री. महेश बर्वे तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी, श्री. नाना मानकर, श्री. सुधाकर कांबळे, श्री. शरद खांदारे, श्री. हरिश्चंद्र मंचेकर श्री. निलेश सुवारे, सौ. निलांबरी परवडी मॅडम, सौ. वृषाली दरडे, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष श्री. विलास दरडे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. प्रभाकर सनगरे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदिप डाफळे यांनी केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व शाखाधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.