लांजा : लांजा शहरातील प्रतिष्ठित सामाजिक शिवसेनेचे कार्यकर्ते आमदार किरणं सामंत यांचे समर्थक अनंत (बापू)जाधव यांच्या सरस्वती निवासस्थानी नुकताच देवी नवचंडी महायाग यज्ञ संपन्न झाला.
सदर यज्ञ हा पंचायत समिती माजी सभापती बाळकृष्ण (आबा) तुकाराम जाधव हे पुर्वी नवचंडी महायाग यज्ञ करत होते. त्यांच्या पाठीमागे काही वर्षं यज्ञ थांबवण्यात आला होता. परंतु तो यज्ञ आता पुन्हा नव्याने त्यांचा मुलगा अनंत (बापू) बाळकृष्ण जाधव यांनी चालू केला आहे. यावेळी दहा ब्राह्मण ठेवण्यात आले होते.त्यांनी मंत्रोच्चार चालू केल्यावर आपोआप अग्नी प्रज्वलित झाला.यानंतर होमहवन करण्यात आला.दोन तास चाललेला यज्ञा नंतर नवचंडी देवीच्या आरती करण्यात आली.
यावेळी लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी आपल्या समर्थकांसह आगमण केले. व चंडीका देवीचे दर्शन घेतले.व उपस्थित भक्तांना महाप्रसाद देण्यात आला.
लांजात नवचंडी महायाग यज्ञ संपन्न….
