खेड :- लायन्स क्लब ऑफ खेड सिटीकडुन ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड (रत्नागिरी) संचालित कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (माध्यमिक विभाग) या प्रशालेचे विज्ञान व गणित विषयाचे शिक्षक श्री. विनोद सुधाकर टेंबे यांना शिक्षण तज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंती निमित्त दिला जाणारा ‘आदर्श गुरुवर्य ’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लायन्स क्लब ऑफ खेड सीटी यांच्यातर्फे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेले शिक्षक, मुख्याध्यापकांना दरवर्षी सदर पुरस्कारांचे वितरण केले जाते. प्रशालेचे विज्ञान व गणित विषयाचे शिक्षक श्री. विनोद सुधाकर टेंबे यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत, व महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. यासाठी या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. मागील 18 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी सतत कार्यरत राहून, शैक्षणिक प्रगतीचा ध्यास घेऊन विज्ञान भाग-1 व गणित विषयाचे उत्कृष्ट मार्गदर्शन, शिष्यवृत्ती परीक्षेस गणित विषयाचे उत्कृष्ट मार्गदर्शन, डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा, Olympiad exam मार्गदर्शन, इत्यादी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. लायन्स क्लब ऑफ खेड सीटीने या सर्व कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार योग्य व्यक्तीला दिला हे ज्ञानदीप परिवाराला अभिमानास्पद आहे.