लोटे : लायन्स क्लब लोटे यांच्या वतीने अध्यक्ष लायन राजेश तिवारी यांच्या वाढदिवसानिमित्त परशुराम येथील जिल्हा परिषद शाळेच्या संगणक कक्षासाठी आवश्यक असलेला प्रिंटर भेट देण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण तसेच विविध शैक्षणिक कामांसाठी मोठी मदत होणार आहे.
या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका तांदळे मॅडम शिक्षकवृंद, पालक संघाचे अध्यक्ष बहूतले , सभासद तसेच पालक उपस्थित होते. लायन्स क्लब लोटेचे अध्यक्ष लायन राजेश तिवारी, सचिव लायन विजय पोटे, लायन धुंडिराज सावंत आणि लायन विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी लायन्स क्लब लोटेने केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. समाजोपयोगी उपक्रमांद्वारे शिक्षण क्षेत्राला सातत्याने सहकार्य करण्याचा निर्धार यावेळी लायन पदाधिकाऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
