चिपळूण : मराठा महाकुटुंब,चिपळूण यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज भव्य जन्मोत्सव सोहळा आयोजन गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. यादिनी सकाळी १०.०० वा महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून भव्य बाईक व कार रॅलीला सुरुवात होणार आहे. सदर रॅलीचामार्कडी पासून शुभारंभ होणार असून त्यानंतर बहादुरशेख,पावरहाऊस,खेंड व शेवटी नगरपरिषद अशा मार्गाने ही रॅली निघणार आहे.
त्यानंतर दुपारी ३:०० वा भव्य शोभायात्रा नगरपरिषद ते छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा मार्कंडी अशी निघणार आहे.यामध्ये पारंपारिक शिव वेशभूषा, साहसी खेळाचे प्रात्यक्षिक, पारंपरिक ढोल ताशा,पारंपरिक गोंधळी संभळ पथक व तुतारी वादन, अश्वनृत्य व हलगी असे विविध वेशभूषा व साहसी खेळांचे प्रदर्शन करत ही रॅली निघणार आहे.दरवर्षी ही रॅली चिपळूणकरांचे आकर्षण ठरत असते. दिवसेंदिवस या रॅलीचे स्वरूप भव्य दिव्य अशा पद्धतीने होत असल्याचे दिसून येते.
सायं : ६:०० वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.तसेच महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.त्यानंतर सायं ७:००वा.मान्यवरांचे स्वागत व अल्पोपहार कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.चिपळूण नगरपरिषदतर्फे सायं ८:०० वा.सांस्कृतिक कार्यक्रम “गर्जा महाराष्ट्र माझा” हा प्रसिद्ध कार्यक्रम होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मराठा रियासत प्रतिष्ठान,चिपळूण आणि मराठा महकुटुंब चिपळूण तालुका यांच्यावतीने उत्तमरित्या व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY