खेड ( दिवाकर प्रभु ) : – मुंबई कांदिवली येथील पालखी बंगल्यावर बुधवार दि. १८ फेब्रुवारी रोजी गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांचा वाढदिवस कुटुंबीयांसमवेत उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी हा कौटुंबिक सोहळा साजरा करण्यासाठी योगेशदादांचे वडील शिवसेना नेते रामदासभाई कदम , मातोश्री सौ.ज्योती ., पत्नी सौ.श्रेया ., दोन्ही मुले., बंधू श्री. सिद्धेश व त्याचे कुटुंब., आदींसह कुटुंबातील अनेकजण उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त केक कापून झाल्यानंतर , मला योगेश व सिद्धेश यांच्यासारखी कर्तृत्वान मुले लाभली, त्यामुळे मी स्वतः भाग्यवान समजतो,असे शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी सांगितले. योगेश कदम यांचे कर्तृत्व पाहता ते भविष्यात मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांच्या मातोश्री सौ. ज्योती यांनी व्यक्त केली आहे.यानंतर मी आई – वडिलांच्या आशिर्वादामुळेच इथपर्यंत पोहोचलो असल्याची भावना सत्कारमूर्ती ना. योगेशदादा कदम यांनी व्यक्त केली.
. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री, खेड दापोली मंडणगडचे आमदार नामदार योगेशदा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त १८ फेब्रुवारी २०२६ रोजी खेड शहर शिवसेनेच्यावतीने इन्फिगो आय केअर हॉस्पिटल व घरडा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती तसेच विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अरुण तथा अण्णासाहेब कदम, नगर परिषदेचे नगराध्यक्ष माधवीताई बुटाला, शहर प्रमुख कुंदन सातपुते यांच्या उपस्थित संपन्न झाले. सदर प्रसंगी उपशहर प्रमुख प्रसाद शिगवण, उपशहर प्रमुख अंकुश विचारे, उपशहर प्रमुख तुषार सापटे, खेड नगरपरिषदेचे शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, नगरसेवक सुनील दरेकर, यश खेडेकर, आरिफ मुल्लाजी, प्रेमल चिखले, मिनार चिखले, स्वप्निल सैतवडेकर, तौसीफ खोत, वर्षा सापटे, आरती पवार दीप्ती शिगवण, अंजुम कुरणे, रेश्मा खतीब, नीता आंब्रे, शिवसेनेचे सर्फराज पांगारकर, पराग बांदिवडेकर, मयुरेश दरेकर, राजू आंब्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरामध्ये घरडा हॉस्पिटलचे डॉक्टर अभिषेक व इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या नेत्रतज्ञ डॉक्टर शिवानी गवई यांनी रुग्णसेवा दिली. शिबिराचे व्यवस्थापन घरडा हॉस्पिटलचे विवेक बनकर व इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे सुशांत पांचाळ व कृतिक तावडे यांनी पाहिले. खेड शहरातील असंख्य नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार श्री योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा चिंचघर दस्तुरी या शाळेत कॉम्प्युटर लॅब चे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक व बावाशेठ मित्र मंडळाचे अध्यक्ष रमेश उर्फ बावाशेठ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सदस्य संग्रामशेठ कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल सदरे ,उद्योजक विजय जाधव, अरविंद सुर्वे, चिंचघर गावचे शिवसेना शाखाप्रमुख समीरशेठ सावंत ,तिसे गावचे उपसरपंच रुपेश शिगवण तसेच बावाशेट मित्र मंडळाचे सदस्य प्रदोष सावंत, वसंत पवार ,शाळा समितीचे अध्यक्ष राजन कदम, माजी अध्यक्ष तानाजी सावंत, शाळेचे मुख्याध्यापक दीपक सूर्यवंशी, फुरूस केंद्रप्रमुख अरुण सागवेकर, चिंचघर केंद्रप्रमुख बिपीन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
यावेळी असगणी गावचे उद्योजक प्रफुल सुधाकर बामणे यांनी शाळेला तीन सिलिंग फॅन भेट दिले,या कार्यक्रमाला अनेक ग्रामस्थ शिक्षक व विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक अनिल मोरे यांनी केले. याव्यतिरिक्त खेड , दापोली व मंडणगड तालुक्यातील विविध विभागात वाढदिवसानिमित्त कार्यक्रम व समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
