पनवेल (वैभव लबडे) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खानावळे येथे सव्यसाची संस्कार वर्ग खानावळे व ग्रामस्थ मंडळ खानावळे यांच्या वतीने मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
सकाळी प्रतिमा पूजन, सांयकाळी शोभायात्रा भगवे ध्वज आणि शिवरायांच्या जयघोषात ही मिरवणूक उत्साहात पार पडली यावेळी लहान मुलानी वेशभूषा परिधान करुन सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सायंकाळी शिवकाळ प्रस्तुति (सव्यसाची संस्कार वर्ग) यांचा शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रश्नमंजुषा व लहान मुलांचा वक्तृत्व कार्यक्रम पार पडला.
यावेळी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गौरव इंगोले यांनी कार्यक्रमाला भेट देऊन सायबर क्राईम तसेच विविध सामाजिक विषयावर मार्गदर्शन केलं. त्यानंतर रात्री शिवसंवाद व्याख्याते संतोष सते, (भाताण) यांनी आपल्या शैलीत व्याख्यान सादर केले. यावेळी ग्रामस्थ व महिलावर्ग मोठ्या संख्येने होते.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
