लांजा : लांजा तालुक्यात आज जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. आरगाव–कोंडगे परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अचानक पडलेल्या या पावसामुळे स्थानिक नागरिकांची तारांबळ उडाली.

सध्या आंबा पिकाची फळधारणा सुरू असताना अवकाळी पावसाचा फटका कोकणातील आंबा बागायतदारांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फुलोरा आणि फळधारणा टप्प्यातील पिकावर या हवामान बदलाचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.

अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून काही ठिकाणी वाऱ्याचा वेगही जास्त होता. नुकसानाचे प्राथमिक अंदाज घेण्याचे काम सुरू आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH