खेड : ( चंद्रकांत बनकर ) : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष साप्ताहिक रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाडीमुळे कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१०७१ मुंबई CSMT – सावंतवाडी रोड विशेष साप्ताहिक गाडी रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी पहाटे ००.२० वाजता मुंबई CSMT येथून सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी १२.३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
तसेच, गाडी क्रमांक ०१०७२ सावंतवाडी रोड – मुंबई CSMT विशेष साप्ताहिक गाडी रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी सायंकाळी १७.२० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटून पुढील दिवशी पहाटे ०३.४५ वाजता मुंबई CSMT येथे पोहोचेल.
ही विशेष गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावरदा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा घेणार आहे.
या विशेष गाडीमध्ये एकूण २० एलएचबी डबे असणार असून त्यामध्ये १८ थ्री टियर एसी इकॉनॉमी डबे आणि २ जनरेटर कारचा समावेश आहे.
गाडी क्रमांक ०१०७२ साठी आरक्षण प्रक्रिया शनिवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ पासून सर्व प्रवासी आरक्षण केंद्र (PRS), इंटरनेट आणि आयआरसीटीसी संकेतस्थळावर सुरू करण्यात येणार आहे.
होळी सणासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही विशेष रेल्वे सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असून प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH