चिपळूण (प्रतिनिधी): येथील युवा नेते , माजी नगरसेवक परिमल भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांचा उद्या शनिवार दि.१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत, कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार आहे. हा पक्ष प्रवेश सोहळा शहरातील राधाताई लाड वैश्य भवन सभागृहात होणार आहे.

परिमल भोसले हे आमदार निलेश राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. भोसले यांनी नगरसेवक पदासह भाजप जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली होती तसेच महत्त्वाची पदेही भूषवली आहेत. भोसले यांनी चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वी भाजपच्या पदांचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर परिमल भोसले यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा उद्या १ मार्च रोजी होणार आहे.

यावेळी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श् रश्मी गोखले, उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, चिपळूण तालुकाप्रमुख संदेश आयरे, नगराध्यक्ष तथा शिवसेना चिपळूण शहर प्रमुख उमेश सकपाळ व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH